माझ्या दृष्टिकोनातून पावसाचे वर्णन… ☔

रिमझिम पडणारा पाऊस… ☔ कुंद वातावरण… हवेत गारवा… आणि त्यासोबत एक नकोसासा ओलसरपणा… 😐
न वाळणारे कपडे… हा तर प्रत्येक घरातला common problem! 😅

आता जरा घराबाहेर पडू…
घरातून बाहेर पडताना सर्वप्रथम फुल साईज रेनकोट चढवायचा… (बऱ्याचदा तो आधीच ओला असतो… पण पर्याय तरी कुठे असतो? 🤷‍♀️)
ऑफिस बॅगलाही तिचा स्वतंत्र रेनकोट. ☹️
अशी सगळी कवचकुंडले चढवून मी माझ्या two-wheeler जवळ येते… आणि तिथे माझं पहिलंच स्वागत होतं ते तिच्या भिजलेल्या सीटने! 😄
मग डिक्कीतून एक ओलसर… किंबहुना कुबट वासाचं फडकं बाहेर काढायचं… त्याने सीट ‘पुसल्यासारखी’ करायची… कारण ती खरंच कोरडी होते का, हा संशोधनाचा विषय आहे! 😂 आणि तेच फडकं पुन्हा डिक्कीत जैसे थे फेकून द्यायचं…

पुढच्या प्रयोगासाठी! 😄
आता खरी परीक्षा सुरू…
अचानक मुसळधार पावसाची सर येते… 🌧️
आपण गाडीवर स्वार… आणि समोरून येणारा पाऊस असा डोळ्यांवर मारा करत असतो की समोर दिसतंय की नाही, याचीच शंका यावी. 😵
एका हाताने गाडी, दुसऱ्या हाताने चेहऱ्यावरचं पाणी पुसणं… आणि मध्येच हेल्मेटच्या काचेवर हात फिरवून पुन्हा ‘Visibility Restore’ करण्याचा निष्फळ प्रयत्न… 🤣
पण तरीही आमची गाडी तिच्या गतीने पुढे जातच असते…

आता वेगळाच अध्याय…
पावसातलं ट्रॅफिक! 😵‍💫
ट्रॅफिक कोणाला नवीन नाही… पण पावसातलं ट्रॅफिक म्हणजे संयम, धैर्य आणि नशीब… तिन्ही गोष्टींची एकत्र परीक्षा! 😂

आत्यंतिक खड्डेमय रस्ते… त्यात गढूळ पाण्यानं पूर्ण भरलेले खड्डे… त्यांची खोली, रुंदी, आकार… काहीच अंदाज येत नाही. 😳
ते खड्डे म्हणजे रस्त्यावरचे surprise packages! 😅
कुठे हलकासा धक्का… तर कुठे थेट कंबर आणि मान एकाच वेळी आठवण करून देणारा धपाटा! 🤭
तरीही अत्यंत सफाईदारपणे असे अनेक खड्डे पार करत आपण मार्गक्रमण करत असतो.

तोवर पाऊस थोडा कमी झालेला असतो… चिरीमिरी सुरू असते… आणि आपल्यालाही वाटतं, “चल, आता जरा बरं…” 😌
…पण नाही!
अडथळ्यांची शर्यत अजून संपलेली नसते.
कुठे रस्त्यांची कामं… कुठे फ्लायओव्हरची कामं… कुठे अरुंद रस्ते… तर कुठे रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त पार्क केलेल्या वाहनांनी अजूनच अरुंद झालेले रस्ते…
आणि या सगळ्यातून बसेस, ट्रक्स, स्कूल बसेस, फोर व्हीलर्स, टू व्हीलर्स, सायकली, रिक्षा, हातगाड्या, पादचारी… सगळेच आपापल्या परीने मार्ग काढत असतात.
त्यात काही महाभाग उलट दिशेने येत असतात… जणू वाहतुकीचे नियम हे फक्त सूचना आहेत, बंधन नाहीत! 🤦‍♀️😂

मधे मधे असलेले ट्रॅफिक सिग्नल… ते बहुतांश तोडण्यासाठीच असतात, हे वेगळं सांगायची गरज नाही. 😄
आणि रस्त्यावर साचलेलं पाणी… ते तर आपलं काम प्रामाणिकपणे करतंच असतं!
कोण कुणावर किती पाणी उडवतं… किंवा उडतं… याचा हिशोब ठेवणं अशक्य! 😂
सुरुवातीला राग येतो… मग सवय होते… आणि शेवटी आपणही मनात म्हणतो, “चल… आज माझा नंबर होता!” 🤣

हे सगळं पार करून…
जीव मुठीत धरून… 😳
पण चेहऱ्यावर आत्मविश्वास ठेवून… 😎
मी अखेर यशस्वीपणे माझ्या कामाच्या ठिकाणी पोहोचते…
आणि मग स्वतःची पाठ स्वतःच थोपटते… 👏😄
कारण…
पावसाळ्यात पुण्यात टू-व्हीलरवरून सुरक्षित ऑफिसला पोहोचणं, हीसुद्धा काही कमी Achievement नसते! 🏆☔😂

— डॉ. मधुरिमा कुलकर्णी

11 Responses

  1. Excellent delineation… मी स्वतःच त्या परीस्थितीत असल्या चा भास झाला प्रत्येक ओळ वाचताना.. keen observation..

  2. मग डिक्कीतून एक ओलसर… किंबहुना कुबट वासाचं फडकं बाहेर काढायचं… त्याने सीट ‘पुसल्यासारखी’ करायची… कारण ती खरंच कोरडी होते का, हा संशोधनाचा विषय आहे! .. 😂 खरच

    Observation 100/100

  3. एक जुनं गाणं आठवलं
    खड्डेच खड्डे चोहीकडे ग बाई
    गेला रस्ता कुणीकडे !!

  4. अत्यंत खुसखुशीत शब्दात संपूर्ण वर्णन, डोळ्यासमोर उभे केलेत. प्रत्येक जण हा अनुभव घेत असतो. प्रत्येकाच्या मनातील शब्दात मांडले. आवडले.

  5. You look so beautiful, the article is the reality which every person faces in Maharashtra.

  6. खरंच सत्य परिस्थिती आहे पावसाळ्यात टू व्हीलर चालवणे खूप अवघड आहे तुम्ही हे छान वर्णन करून लिहिले आहे अगदी छोटी छोटी बाब सुद्धा व्यवस्थित मांडली आहे

  7. अगदी तंतोतंत वर्णन… खरं अनुभव देतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Related Posts

निसर्गाच्या कुशीतला एक तास..
WhatsApp Image 2026-06-21 at 11.33

Search

Categories

Subscribe to my Newsletter

No spam, notifications only about new stories and updates

Latest Posts

About Me

Hi! I am Dr. Madhurima Kulkarni

I am a Doctor and a phycology counselor by profession with a passion of reading. After having read a lot of books, magazines and online posts, I realized that I also posses a knack to write. My written work started getting some recognition.
So, this is my attempt to share whatever little work with YOU… Read, subscribe and comment your suggestions and feedback too.

Thank you