त्यात काय वेगळं सांगणार? माहित आहे, आता ही बाई काय बोलणार? उपदेशाचे डोस पाजून वेगळं व्ह्यायच, हिला काय कळणार किती आणि कशाकशातून जावं लागतं ते. लेख लिहायचे, पोस्ट टाकायच्या, सल्ले द्यायचे ..बाई आयुष्य जगणं एवढं सोपं नाही ग…जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे. अगदी हेच येतंय ना तुमच्या मनात ..माझ्याही…पण म्हणूनच वाचा शेवटपर्यंत …तुमच्या मनाच्या आनंदाची किल्ली मी तुम्हाला देणार आहे.
प्रत्येक स्त्रिच्या मनाची जडण घडण वेगळी असते. एखादा अक्स्मिकपणे बसणारा धक्का सहन करणं सर्वांसाठीच अवघड असतं. पण काही स्त्रिया त्यातून लौकर सावरतात, काहीजणी ते दुःख आयुष्यभरासाठी घेऊन जगतात, तर काहींना प्रचंड शॉक लागून त्यांचं पूर्ण आयुष्य बरबाद होऊ शकत. अशाच प्रकारे सर्वच भावना सर्व स्त्रिया एकाच पद्धतीने handle करू शकत नाहीत. राग, द्वेष, एखाद न आवडणार नात, न आवडणारी व्यक्ती मनाला त्रासच देतात. पण प्रचंड झालेला आनंद सुद्धा एखादी स्त्री सहन करू शकत नाही…हे थोड न पटण्यासारखं आहे पण अस असतं.
स्त्रीची मानसिकता अनेक गोष्टींवर अवलंबून असते. जवळची माणसे, नाती, परिस्थिती, वय, ताणतणाव,आर्थिक अडचणी, रोज येणारे वेगवेगळ्या स्तरांवराचे problems, आजारपण ….असंख्य कारण आहेत. पण 90% स्त्रिया यातून मार्ग काढतात आणि पुढे जातात. ही दैवी देणगी परमेश्वराने स्त्रीला दिली आहे..फार मोठी भाग्याची गोष्ट आहे.
सर्व भगिनींना , मग त्या कुठल्याही वयातल्या असोत, कुठल्याही परिस्थिती मधल्या असोत, हुशार, गरीब, श्रीमंत, शिकलेल्या, नोकरी करणाऱ्या, house wifes, धुणी भांडी करणाऱ्या, मोठ्या कंपनीच्या मालकीण असणाऱ्या अगदी कुणीही सगळ्याजणीना अनेक वेळा क्लेशदायक मानसिक स्थितीतून जावं लागतच. ” नको हे आयुष्य, कुठतरी पळून जावं वाटतंय ” ही भावना नेहमी मनात येते त्या सगळ्यांसाठी एक कानमंत्र
जेंव्हा मन खूप अस्वस्थ आहे, काही सुचत नाहीये , मनात टोकाचे विचार येत आहेत तेंव्हा
1.क्षणभर थांबा आणि मोठे मोठे श्वास घ्या…पाणी प्या .मनाला आधी शांत करा आणि मग पुन्हा विचार करायला लागा. नक्की तुमच्या अस्वस्थतेमधे तुम्हाला फरक जाणवेल.
2. तुमच्या जवळच्या व्यक्तीला ( आई, वडील, बहिण, मावशी काकू, आत्या, मैत्रीण, भाऊ, ) अगदी कोणीही त्यांना फोन करा मात्र लगेच प्रोब्लेम बोलू नका , आवंतर गप्पा मारा
3. संगीत ऐका, टीव्हीवर एकदा प्रोग्राम बघा, बाहेर चक्कर मारून या, तुम्हाला आवडणारे काम करा
4. मनातले विचार खूप टोकाचे असतील तर जी व्यक्ती जवळ आहे तिला ताबडतोप contact करा, मनाची अवस्था स्पष्टपणे बोला.
हे सर्व उपाय तर आहेतच. पण मन दुबळ ठेवण्यापेक्षा त्याला कणखर बनवा. त्यासाठी आधी स्वतःवर प्रेम करायला शिका, स्वतःचा सन्मान करायला शिका, स्वतःसाठी वेळ काढायला शिका, गरज नसेल तिथे नाही म्हणायला शिका, स्वतःचे म्हणणे समोरच्याला शांतपणे पटवून द्यायला शिका, तुमच्या आवडी, छंद जोपासायला शिका, मनाला आनंदी राहायला शिकवा.
यातून तुमचे सशक्त मन आकाशात उंच भरारी घेईल…अगदी नक्की..
डॉ मधूरिमा कुलकर्णी