निसर्गाच्या कुशीतला एक तास… आणि मनात कायमचा साठवलेला अनुभव!

आजचा सकाळचा मॉर्निंग वॉक म्हणजे फक्त चालणे नव्हते… तो निसर्गाशी झालेला एक सुंदर संवाद होता.
ओलचिंब वातावरण… घाटातून वळणावळणाने जाणारा रस्ता… दोन्ही बाजूंनी दाट हिरवाईने नटलेले डोंगर… मधूनच खळखळत वाहणारे छोटे झरे… रिमझिम पावसाच्या सरी… आणि त्या सगळ्यावर पसरलेली सकाळची प्रसन्न शांतता!
त्या शांततेलाही एक आवाज होता…
नजरेस न पडणाऱ्या पक्ष्यांचा मधुर आवाज… झाडांच्या पानांतून वाहणाऱ्या वाऱ्याची सळसळ… झऱ्यांच्या पाण्याची खळखळ… आणि पावसाच्या प्रत्येक थेंबाने निसर्गाने निर्माण केलेलं एक अप्रतिम संगीत!

अंगात रेनकोट घालून त्या रस्त्यावर चालताना पावसाचा प्रत्येक थेंब जणू सोबतीला चालत होता. मधूनच एखादं सुंदर दृश्य दिसलं की फोटो काढण्याचा मोह काही आवरत नव्हता. पण कॅमेऱ्यात कैद होणाऱ्या दृश्यांपेक्षा डोळ्यांत आणि मनात साठणाऱ्या आठवणी कितीतरी सुंदर असतात, हेही पुन्हा जाणवलं आणि रेनकोट काढून पावसाला अंगावर झेलताना मनातली लहानपणीची ओढ भरभरून कधी बाहेर आली समजलच नाही…

रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांचं निरीक्षण करताना काही झाडं जुनी ओळखीची वाटली… तर काही पहिल्यांदाच पाहताना मनात वेगळंच कुतूहल निर्माण करत होती. प्रत्येक झाड, प्रत्येक पान, प्रत्येक वेल… जणू निसर्गाचं स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्त्व सांगत होती.

हा फक्त एक तासाचा वॉक होता… पण त्या एका तासाने मनाला अनेक तासांची शांतता दिली.

निसर्ग आपल्याला बोलत नाही… पण तो खूप काही शिकवतो. संयम शिकवतो… सतत वाहत राहणं शिकवतो… प्रत्येक ऋतूचा आनंद घ्यायला शिकवतो… आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आयुष्य कितीही धावपळीचं असलं तरी थोडा वेळ स्वतःसाठी आणि निसर्गासाठी राखून ठेवायला शिकवतो.

आज पुन्हा एकदा जाणवलं…
मन शांत करायचं असेल, तर निसर्गाच्या जवळ जा. कारण निसर्गाकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नसतं… पण प्रत्येक अस्वस्थ मनाला शांत करण्याची ताकद मात्र नक्कीच असते.

डॉ मधुरिमा कुलकर्णी

8 Responses

  1. अप्रतिम वर्णन निसर्गात असल्याचा अनुभव घर बसल्या अनुभवला …निसर्ग पावसाळ्यात जी हिरवी शाल पांघरतो ती अवर्णीय असते त्यात रिमझिम पावसाची सर..आणि बरेच खुणावणारे वाफाळते पदार्थ सुख…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Related Posts

माझ्या दृष्टिकोनातून पावसाचे वर्णन..
WhatsApp Image 2026-06-21 at 11.33

Search

Categories

Subscribe to my Newsletter

No spam, notifications only about new stories and updates

Latest Posts

About Me

Hi! I am Dr. Madhurima Kulkarni

I am a Doctor and a phycology counselor by profession with a passion of reading. After having read a lot of books, magazines and online posts, I realized that I also posses a knack to write. My written work started getting some recognition.
So, this is my attempt to share whatever little work with YOU… Read, subscribe and comment your suggestions and feedback too.

Thank you