ताण प्रत्येकाचा असतो… पण तो पेलण्याची पद्धत वेगळी असते!
प्रत्येक व्यक्तीची एक Stress Level असते.
कुणाला छोट्या गोष्टींनीही खूप ताण येतो, तर कुणी मोठ्या संकटातूनही शांतपणे मार्ग काढतो.
याचा अर्थ एक जास्त कणखर आणि दुसरा कमकुवत असतो, असा अजिबात नाही.
आपली भावनिक संवेदनशीलता, स्वभाव, परिस्थिती, अनुभव आणि त्या वेळची मानसिक अवस्था यावर आपण ताण कसा घेतो आणि तो कसा हाताळतो, हे ठरत असतं.
आज विशेषतः १६ ते २५ वयोगटातील मुलं अनेक प्रकारच्या ताणातून जात आहेत, अभ्यास, करिअर, स्पर्धा, अपेक्षा, सोशल मीडिया, नातेसंबंध, comparison…
बाहेरून सगळं ठीक दिसत असलं तरी आतून एखादं मूल सतत संघर्ष करत असू शकतं.
दुसरीकडे Menopause च्या आसपासच्या स्त्रियांमध्ये शरीरातील हार्मोनल बदल, झोपेच्या समस्या, घर,नोकरीच्या जबाबदाऱ्या, मुलांचं बदलतं आयुष्य, नात्यांमधले बदल… या सगळ्यांचा मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
आणि पुरुषही त्याला अपवाद नाहीत.
आर्थिक जबाबदाऱ्या, कामाचा ताण, कुटुंबाची काळजी, भविष्याची चिंता, पण “पुरुषांनी मजबूत असायलाच हवं” या समजुतीमुळे ते अनेकदा भावना व्यक्तच करत नाहीत.
मग हा ताण carry कसा करायचा?
1. प्रत्येक गोष्ट मनावर घेऊ नका.
आपल्या हातात काय आहे आणि काय नाही, हे वेगळं करा. उदा. परीक्षेचा अभ्यास आपल्या हातात आहे; पण निकालाची प्रत्येक शक्यता आपल्या हातात नाही.
2. मनात साठवून ठेवू नका.
विश्वासू व्यक्तीशी बोला. कधी कधी problem चा solution मिळण्यापेक्षा मन मोकळं होणं जास्त महत्त्वाचं असतं.
3. शरीराला विश्रांती द्या.
पुरेशी झोप, नियमित व्यायाम, योग्य आहार आणि थोडा स्क्रीन-ब्रेक,हे मानसिक आरोग्याचेही भाग आहेत.
4. स्वतःची तुलना थांबवा.
Social media वर दिसणाऱ्या दुसऱ्यांच्या आयुष्याशी आपल्या आयुष्याची तुलना करू नका. आपल्याला त्यांची highlight reel दिसते; त्यांचा संपूर्ण संघर्ष नाही.
5. प्रत्येक भावना चुकीची नसते.
राग, दुःख, भीती, अस्वस्थता… या भावना आहेत. त्यांना दाबण्याऐवजी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
6. आणि सर्वात महत्त्वाचं, मदत मागायला घाबरू नका.
ताण इतका वाढला की झोप, काम, अभ्यास, नाती किंवा दैनंदिन आयुष्य प्रभावित होऊ लागलं, तर Counsellor किंवा Mental Health Professional ची मदत घेणं ही कमजोरी नाही.
काही लोकांचा ताण दिसतो…
काहींचा ताण शांत असतो…
आणि काही लोक हसत हसत खूप मोठा ताण घेऊन जगत असतात.
म्हणूनच आजूबाजूच्या माणसाला फक्त “काय झालं?” असं विचारण्यापेक्षा कधी कधी एवढंच विचारा,
“तू खरंच ठीक आहेस ना?”
कारण मानसिक ताण कमी करण्यासाठी प्रत्येक वेळी मोठे उपाय लागतातच असं नाही…
कधी कधी समजून घेणारा एक माणूसही पुरेसा असतो.
डॉ मधुरिमा कुलकर्णी
9 Responses
Truly said …
100% Correct
Kalate pan valat nahi ,tyala kay karu shakto
Ha prayatna karata yeil ,pan vichar parat parat yeun tan yetoch
,👍✅
Good guidelines…!!
Khoop upyogi aahe lekh👍👌
Good!!
Good
Dear Doctor, This is really a uncomfortable present situation, apart from this our thoughts are our suffering,face the situation as there is any alternative.