आज तुमचा सर्वांचा सल्ला हवा आहे.
मी डॉ. मधुरिमा कुलकर्णी. गेली २० वर्षे पुण्यात General Physician म्हणून स्वतःचं क्लिनिक चालवते आहे. गेल्या वर्षी Psychology Counseling चा कोर्स करून समुपदेशन केंद्रही सुरू केलं. तेही छान चाललंय.
फॅमिली लाईफ? अगदी नॉर्मल…
प्रेम, भांडणं, जिव्हाळा, तक्रारी… प्रत्येक घरात असतं ते सगळं आमच्याही घरात आहे.
नवरा प्रेमळ ❤️, मुलगा-सून त्यांच्या संसारात आनंदात 🥰, व्यवसाय समाधानकारक, आर्थिक ताण नाही, मैत्रिणी भरपूर, ट्रिप्स, गेट-टुगेदर्स, वाचन, लिखाण, पेंटिंग… म्हणजे खरं तर “तक्रार करण्यासारखं काहीच नाही” अशी आयुष्याची अवस्था! 😎
…पण तरीही एक गोष्ट मला हल्ली प्रचंड थकवते आहे.
माझ्या क्लिनिकमध्ये एखादा पेशंट येतो आणि म्हणतो… “डॉक्टर, चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजची लिस्ट सांगा.” 🤔
दुसरे म्हणतात… “मुलाला ट्युशन लावायची आहे, एखादे टीचर सुचवा.” 😐
आणखी पुढे… “मुलगी लग्नाची आहे… एखादं स्थळ असेल तर सांगा.” 😭
आता बोला…!!
माझं काम लोकांचे आरोग्य जपणं आहे. ते मी मनापासून करते. पण मला माहीतच नसलेल्या, माझ्या क्षेत्राशी संबंध नसलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याची लोकांची अपेक्षा दिवसेंदिवस वाढते आहे.
आणि गंमत म्हणजे… “नाही माहित” असं म्हणायला माझंच मन तयार होत नाही. कुणाला दुखवायचं नाही म्हणून काहीतरी उत्तर शोधायचा प्रयत्न करते… आणि शेवटी स्वतःच मानसिकरीत्या थकून जाते. 🥴
मग सांगा बरं…
अशा वेळी नम्रपणे “मला माहीत नाही” किंवा “मी याबद्दल योग्य व्यक्ती नाही” हे कसं सांगायचं?
तुमच्याकडे यावर काही औषध आहे का? 😄💊
असेल तर नक्की सुचवा… कारण आज डॉक्टरलाच उपचाराची गरज पडली आहे! 🤦🏻♀️❤️
तुमचीच,
डॉ. मधुरिमा कुलकर्णी ❤️😘
8 Responses
अगदी खरंय
हा अनुभव मला पण आला
You are giving too much liberty to your patients. You are spending too much time with your patient to hear their complaints.
If you really want to get rid from this problem, take history in short..write down medicine that’ s all…
If the patient feels that doctor has too much time and doctor is talkative the things above mentioned can happen. Be strict to your work.
आपल्याला माहीत नसलेल्या पुष्कळ गोष्टी आहेत. त्यामुळे याबाबतीत आपले अज्ञान चटकन प्रकट केल्यास आपला बराच वेळ वाचू शकतो.
👍😊
आपल्या कार्यक्षेत्राचा अनुभव लक्षात घेता variety kiva वेगवेगळे क्षेत्रातील लोक आपणास भेटत असतील त्यांच्या सोबत संवाद साधताना इतरही गोष्टी बोलल्या जात असतात त्या मुळे लोकांना तुम्हाला बऱ्याच क्षेत्रातील माहिती असेल असे वाटणे स्वाभाविक आहे ..
पण आपण दिलखुलास पणे मी अनभिद्यं आहे या sub बाबत सांगितलं tr येणारी Hi अस्वस्थता टाळता येऊ अश्कल असे माझे वयक्तिक मत आहे…
मनमोकळेपणाने हे मला माहित नाही हे कबूल करायचे.
” अरे वा किती मोठा झाला तुमचा कौस्तुभ ..!
त्याला खरंच इंजीनियरिंगला ऍडमिशन घ्यायची आहे ना ,
मग त्याच्याशी बोलूनच एखाद्या करिअर गायडन्स कौन्सिलर कडे गेलेले बरं राहील…”
———
” सानिकाशी तिच्या लग्नाबद्दल बोलला आहात का?
तिच्या काय अपेक्षा आहेत , त्यानुसार एखाद्या चांगल्या वधू वर सूचक मंडळाचा पत्ता तुम्हाला इथे पुण्यात नक्कीच मिळेल.. ”
तुझ्या वैद्यकीय व्यवसायासोबत समुपदेशनाचे काम तू करणार असशील, तर एका वाक्यात
“मला माहित नाही ,तुमचं तुम्ही शोधा ”
असं म्हणण्यापेक्षा ,
त्यांचा प्रश्न ज्या विषयाशी निगडित आहे त्या संबंधित ,
मुलगा आणि मुलगी याच्याशी बोलणं सुद्धा गरजेचं आहे …
हे त्यांच्या लक्षात आणून दिलं आणि त्यानुसार योग्य एजन्सीची मदत घेता येईल हे सुचवलं….
असा संवाद झाला आता अधिक उपयुक्त होईल असं मला वाटतं
खूप छान 👍