मी आणि माझा रविवार

संपूर्ण आठवडा पेशंट, दवाखाना, रिपोर्ट्स, औषधं, जबाबदाऱ्या…
मनाची आणि शरीराची झपाट्याने चाललेली धावपळ.
कधी कळतंच नाही, सोमवार ते शनिवार कधी संपून जातो.

पण…
रविवार मात्र काहीतरी वेगळा असतो.
सप्तरंगांनी भरलेला… प्रत्येक आठवड्यात एक छोटासा उत्सव!

कधी तो रविवार लोळतच घालवावासा वाटतो —
उशीच्या कुशीत लपून, वेळेकडे पाठ फिरवून…

कधी एखादा सिनेमा, नाटक पाहायला जावं वाटतं —
मनाची कातर वेदना विसरवून काहीतरी अनुभवावं वाटतं…

तर कधी “माझ्या” लोकांना एखादं चविष्ट जेवण भरवावंसं वाटतं —
त्या हसऱ्या चेहऱ्यांमध्ये आपलं समाधान शोधावं वाटतं…

कधी मनात उगाच खरेदीचा हट्ट होतो —
छोट्या छोट्या गोष्टी घेऊन स्वतःला आनंद द्यायचा प्रयत्न!

तर कधी घरातच… किचनमध्ये — एखादी जुनी आवडती रेसिपी बनवावी…
कधी स्वतःसाठी, कधी संपूर्ण कुटुंबासाठी…

माझा रविवार एकसारखा कधीच नसतो.
पण तो ‘माझा’ असतो — माझ्या मनाप्रमाणे, माझ्या माणसांसोबत, माझ्या शैलीत…

संध्याकाळ झाली की रविवार संपल्याची थोडीशी खंत जरूर वाटते,
पण त्याचवेळी मनात येतं —
“पुन्हा एकदा सोमवार येतोय, कारण पुढचा रविवारही येणार आहे!”

आणि पुन्हा नव्याने सुरु होतं माझं डॉक्टरपण…
नवे रुग्ण, नवी भेटी, नवे अनुभव आणि नवी शिकवण…
कारण दर रविवारी मी थोडी ‘मी’ होते —
आणि बाकीच्या दिवशी मी ‘डॉक्टर’…!

थोडक्यात मी माझा रविवार भरभरून जगते ❤️

डॉ मधुरिमा कुलकर्णी

3 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Related Posts

माझ्या एका शब्दानं काय झालं असतं
माझ्या रूटीनमध्ये घडणाऱ्या गंमतीजमती

Search

Categories

Subscribe to my Newsletter

No spam, notifications only about new stories and updates

Latest Posts

About Me

Hi! I am Dr. Madhurima Kulkarni

I am a Doctor and a phycology counselor by profession with a passion of reading. After having read a lot of books, magazines and online posts, I realized that I also posses a knack to write. My written work started getting some recognition.
So, this is my attempt to share whatever little work with YOU… Read, subscribe and comment your suggestions and feedback too.

Thank you