सुंदर दिसणं म्हणजे काय हो? गुलाबी गोरा रंग, हरिणी सारखे डोळे, चाफेकळी नाक, डाळिंब ओठ, शेलाटा बांधा…इत्यादी इत्यादी 👸🏻
तर अर्थातच हो…शब्दांमध्ये सुंदर स्त्रीचे हेच वर्णन आहे..कथा, कादंबऱ्या, सिनेमे यातल्या बायका अशाच की हो असतात…म्हणून तर हिरो त्यांच्यामागे हात धून लागलेला असतो.🏃🏼
पण सगळ्याजणिंमधे सगळे गुण एकाच वेळी दिसणे तसे दुरापास्त. 😞 पण असतं एखादं गावरान सौंदर्य…👧🏻 जे सगळे गुण घेऊन जन्माला आलेलं असतं. मग त्या देवाची तारीफच तारीफ…🥳
बाकीच्या अशा वेळी कदाचित देवाला मनातल्या मनात अगदी दूषण देत असतील ” आम्ही काय रे बाबा तुझं बिघडवले होते…थोडा रंग तरी उजळ द्यायचास की” या टाईप थोडफार…🤦🏻♂
म्हणजे अशी जर सौंदर्याची व्याख्या असेल तर देवाला रोज अगदी प्रत्येक क्षणाला किती शिव्या खाव्या लागत असतील ते तो एकटाच जाणे…खरच बिचारा…🤔
आता इतके टोमणे, शिव्या खाल्ल्यावर देवाचे पोट नक्की भरले असणार.🤨 मग किती नैवेद्य मिळोत… कसं खाणार? देवाच्या पोटात तर खूप दुखतंय , त्यात त्या नैवेद्याच्या शिऱ्यान भर घातली😋
काय करणारं आपलेच दात आणि आपलेच ओठ…सगळी लेकरं त्याचीच..मग कोणाला झाकायचं आणि कोणाला काढायचं? विचार करून करून देवाच्या मेंदूचा सुद्धा भुगा झाला…😧
पण शेवटी तो परमात्मा….सगळ्या जगाचा मालक..🙏🏻.युक्ती तर काढलीच पाहिजे.
खूप डोक खाजवल्यावर एक idea मेंदूच्या भुग्यातून वर आली. 🤗 आधी देवाने आपले आसन नीट केले. मेंदूला जागेवर जाऊन बसायची आज्ञा केली. आणि ” धन्वंतरी” 👨🏼⚕नामक देवाची भेट घेतली. त्यांच्यात काही चर्चा झाली आणि ” प्लास्टिक सर्जन” अशा पृथ्वीवरच्या सौंदर्य सुधारणाऱ्या आधुनिक मानवनिर्मित देवाचा जन्म झाला. 🦸🏼♂
सध्या हा प्लास्टिक सर्जन इतका बोकाळला आहे की नैसर्गिक सौंदर्य पुन्हा फक्त कथा , कादंबऱ्यांमधे कैद झालंय. प्रत्येक वयाची स्त्री सगळ्या angle ने सुंदरच दिसते. मग ती 10 वर्षांची चिमुरडी असो नाहीतर 70 वर्षांच्या आजीबाई…💃🏻
गल्लोगल्ली झालेली ब्युटीपार्लर्स 💇🏻♀ म्हणजे खरतर या सुंदरतेचे दवाखाने आहेत. यांची निर्मिती सुद्धा परम, महान देवाने स्वतःच्या सोयीसाठी केली आहे.
आता आजकाल देवाला स्त्री वर्गाचे टोमणे ऐकू येणं बंद झालंय. 🫶🏻 त्यामुळे देव पुन्हा त्याच्या पारंपरिक नैवेद्याची भरपूर पारायणे करण्यात busy आहे. ❤
डॉ मधुरिमा कुलकर्णी