मानण्यावर आनंद 🌿

 

सहज बसल्या बसल्या मनात एक प्रश्न तरळून गेला, आनंदाच्या परिसीमा नेमक्या कशा ठरवाव्यात?
या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक व्यक्तिगणिक अर्थातच खूप वेगळे असणार. तरीही याचे एखादे general statement असू शकते का?

अगदी सुखी माणसाच्या सदर्यापासून ते हिरे-माणिक-मोत्यांनी मढवलेल्या सोन्याच्या पलंगावर झोपणाऱ्या राजापर्यंत सगळेच आनंदी आहेत की…

तर मी माझा आनंद कशात मोजते?
थोडक्यात सांगायचे तर ,
“कधीही न बदलणाऱ्या भूतकाळाला सोडून द्या. ज्याबद्दल काहीच माहिती नाही अशा भविष्यकाळाला धरून बसू नका. जे आहे ते आत्ता, इथेच — केवळ वर्तमानात जगा.”
आणि या बरोबर कोणाचे वाईट चिंतू नका, करू नका. तेवढेच महत्त्वाचे म्हणजे कोणाला स्वतःचा विनाकारण फायदा घेऊ देऊ नका.
या विचारधारेतून जे समाधान मिळते तोच तर आनंद… नाही का?
रोज रात्री झोपताना मी univers ला हात जोडते. काही चुकले असल्यास माफी मागते आणि शक्यतो त्या दिवसाचा विचार मनातून काढून टाकते. पुस्तकाची दोन-तीन पाने वाचेपर्यंत झोप कानाशी गुणगुणायला लागते.
या बाबतीत एक सांगावेसे वाटते , ज्यांना अगदी निद्रानाशापर्यंत त्रास झाला असेल, त्यांच्यासाठी रात्रीची पाच तासांची झोप म्हणजे जणू काही स्वर्गसुखच… 🌙
मी त्यातलाच एक प्राणी.
वयाप्रमाणे इतकी झोप पुरेशी असावी. ज्यांना ती सहज येते ते देवाची कृपा लाभलेले. माझा आनंद मात्र या गोष्टीतही आहे.
अर्थात ही स्थिती कायम अशीच राहील असे नाही. एखादी रात्र खूप हट्टी असेल, तर त्या रात्री झोप तुमच्याकडे फिरकणार नाही. पण त्या रिकाम्या आणि भकास वाटणाऱ्या वेळेचाही काही वेगळा उपयोग होऊ शकतो. वाचा, एखादा मस्त सिनेमा बघा, एखादे वेळ मिळत नाही म्हणून राहून जाणारे काम करा. ,अगदी काहीही…एकटेपणात जाणारी ही भकास रात्रही अगदी गोड आनंद देऊन जाईल.

आनंदासाठी कुठलाही “वैज्ञानिक सिद्धांत” ही संकल्पना मला पटत नाही. स्वतः व्यक्तीने ठरवले तर ती एखाद्या particular गोष्टीने, परिस्थितीने किंवा आवडत्या व्यक्तीसोबत आनंदी होऊ शकतेच. फक्त यासाठी मनाच्या परवानगीची मात्र आवश्यकता आहे.

“मानण्यावर आनंद” ही संकल्पना मात्र मला पूर्णपणे पटते.

आनंदाची एक गुरुकिल्ली असते ती म्हणजे तुमच्या आजूबाजूला असणारी माणसे. मग ती कोणीही असोत. संवाद साधला तर आपल्याला तरलता देणारी, सुख देणारी अनेक माणसे आपल्या आजूबाजूलाच असतात.
मित्र-मैत्रिणी आणि काही नाती (जवळची अथवा मानलेली) कायम समाधान देतात आणि तेही चिरंतन. मग अशा व्यक्तींना आपल्या आयुष्यात एक विशिष्ट स्थान असायलाच हवे.
आणि हो जर भरभरून द्याल, तरच हा आनंद तुमच्याकडे परत येईल… तोही अगदी भरभरून.

शेवटी इतकेच , ज्या गोष्टींनी मनाला त्रास होतो, त्यांना दूर करा. आणि ज्यांनी मनाला बरे वाटते, त्यांच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करा.
बघा, तुमचा आनंद दुसऱ्या कोणाजवळ नाही तर तो फक्त तुमच्याजवळ आहे हे तुम्हाला निश्चित जाणवेल.

अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिल्यावर माझे तरी हे मत आहे…
तुमचे काय? ❤️

डॉ. मधुरिमा कुलकर्णी

18 Responses

  1. अगदी बरोबर. खूप छान विचार मांडले आहेत मधुरिमा

Leave a Reply to Dr Chandrashekhar Kulkarni Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Related Posts

24086808
5909

Search

Categories

Subscribe to my Newsletter

No spam, notifications only about new stories and updates

Latest Posts

About Me

Hi! I am Dr. Madhurima Kulkarni

I am a Doctor and a phycology counselor by profession with a passion of reading. After having read a lot of books, magazines and online posts, I realized that I also posses a knack to write. My written work started getting some recognition.
So, this is my attempt to share whatever little work with YOU… Read, subscribe and comment your suggestions and feedback too.

Thank you