सौंदर्याची थोडी मजा

सुंदर दिसणं म्हणजे काय हो? गुलाबी गोरा रंग, हरिणी सारखे डोळे, चाफेकळी नाक, डाळिंब ओठ, शेलाटा बांधा…इत्यादी इत्यादी 👸🏻
तर अर्थातच हो…शब्दांमध्ये सुंदर स्त्रीचे हेच वर्णन आहे..कथा, कादंबऱ्या, सिनेमे यातल्या बायका अशाच की हो असतात…म्हणून तर हिरो त्यांच्यामागे हात धून लागलेला असतो.🏃🏼

पण सगळ्याजणिंमधे सगळे गुण एकाच वेळी दिसणे तसे दुरापास्त. 😞 पण असतं एखादं गावरान सौंदर्य…👧🏻 जे सगळे गुण घेऊन जन्माला आलेलं असतं. मग त्या देवाची तारीफच तारीफ…🥳
बाकीच्या अशा वेळी कदाचित देवाला मनातल्या मनात अगदी दूषण देत असतील ” आम्ही काय रे बाबा तुझं बिघडवले होते…थोडा रंग तरी उजळ द्यायचास की” या टाईप थोडफार…🤦🏻‍♂

म्हणजे अशी जर सौंदर्याची व्याख्या असेल तर देवाला रोज अगदी प्रत्येक क्षणाला किती शिव्या खाव्या लागत असतील ते तो एकटाच जाणे…खरच बिचारा…🤔

आता इतके टोमणे, शिव्या खाल्ल्यावर देवाचे पोट नक्की भरले असणार.🤨 मग किती नैवेद्य मिळोत… कसं खाणार? देवाच्या पोटात तर खूप दुखतंय , त्यात त्या नैवेद्याच्या शिऱ्यान भर घातली😋

काय करणारं आपलेच दात आणि आपलेच ओठ…सगळी लेकरं त्याचीच..मग कोणाला झाकायचं आणि कोणाला काढायचं? विचार करून करून देवाच्या मेंदूचा सुद्धा भुगा झाला…😧

पण शेवटी तो परमात्मा….सगळ्या जगाचा मालक..🙏🏻.युक्ती तर काढलीच पाहिजे.

खूप डोक खाजवल्यावर एक idea मेंदूच्या भुग्यातून वर आली. 🤗 आधी देवाने आपले आसन नीट केले. मेंदूला जागेवर जाऊन बसायची आज्ञा केली. आणि ” धन्वंतरी” 👨🏼‍⚕नामक देवाची भेट घेतली. त्यांच्यात काही चर्चा झाली आणि ” प्लास्टिक सर्जन” अशा पृथ्वीवरच्या सौंदर्य सुधारणाऱ्या आधुनिक मानवनिर्मित देवाचा जन्म झाला. 🦸🏼‍♂

सध्या हा प्लास्टिक सर्जन इतका बोकाळला आहे की नैसर्गिक सौंदर्य पुन्हा फक्त कथा , कादंबऱ्यांमधे कैद झालंय. प्रत्येक वयाची स्त्री सगळ्या angle ने सुंदरच दिसते. मग ती 10 वर्षांची चिमुरडी असो नाहीतर 70 वर्षांच्या आजीबाई…💃🏻

गल्लोगल्ली झालेली ब्युटीपार्लर्स 💇🏻‍♀ म्हणजे खरतर या सुंदरतेचे दवाखाने आहेत. यांची निर्मिती सुद्धा परम, महान देवाने स्वतःच्या सोयीसाठी केली आहे.

आता आजकाल देवाला स्त्री वर्गाचे टोमणे ऐकू येणं बंद झालंय. 🫶🏻 त्यामुळे देव पुन्हा त्याच्या पारंपरिक नैवेद्याची भरपूर पारायणे करण्यात busy आहे. ❤

डॉ मधुरिमा कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Related Posts

Screenshot_20250810_233854_Facebook
Screenshot_20250810_233408_Facebook

Search

Categories

Subscribe to my Newsletter

No spam, notifications only about new stories and updates

Latest Posts

About Me

Hi! I am Dr. Madhurima Kulkarni

I am a Doctor and a phycology counselor by profession with a passion of reading. After having read a lot of books, magazines and online posts, I realized that I also posses a knack to write. My written work started getting some recognition.
So, this is my attempt to share whatever little work with YOU… Read, subscribe and comment your suggestions and feedback too.

Thank you