मानसिक आरोग्याचे महत्व

सध्या सोलापूरचे प्रसिद्ध मेंदूविकारतज्ञ डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी केलेल्या आत्मघाताने वातावरण आणि मनही खूप सुन्न झाले आहे. कारण काहीही असो आज आपल्या समाजाने जे गमावले आहे ते पुन्हा फिरून परत येणार नाहीये.

अस वाटतं आहे की एखादा माणूस मग तो कुठल्याही क्षेत्रात असेल त्याच्या यशस्वी होण्याची किंवा असण्याची व्याख्या काय असावी? खूप पैसा, खूप नावलौकिक, खूप मानसन्मान अशी तर ती असू शकत नाही. कारण व्यक्तिगणिक यशस्वी ही संकल्पना बदलते.

exa…एखादी अडाणी अशिक्षित बाई अत्यंत हलाकीच्या स्थितीमध्ये भाजी विकून किंवा धुणीभांडी अशी तत्सम कामे करून मुलांना वाढवते, शिकवते , स्वतःच्या पायावर उभे करते. आता याचा विचार तिच्या दृष्टिकोनातून केला तर ती तिच्या आयुष्यात यशस्वी झाली असेच म्हणावे लागेल. इथे ना पैसा आहे, ना प्रतिष्ठा, ना नावलौकिक पण तरीही ती 100% यशस्वी आहेच.

मग यशस्वी याची व्याख्या अशी होऊ शकेल की व्यक्तिगणिक जी ध्येय निश्चिती असेल तिच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत आपल्या ध्येयाच्या जितके जवळ जाऊ तितके यश तुमच्या जवळ येईल.
क्षेत्र कुठलेही असो मानसिक आरोग्य उत्तम असणे हे आपला श्वास घेण्याइतके गरजेचे आहे. ( आजच्या काळाला धरून तरी असेच म्हणावे लागेल) अनेक पातळ्यांवर एकाच वेळी लढताना मानसिक ताकद जितकी strong तितकी व्यक्तीची stability भक्कम राहील.

ताण तणावाची कारण तर असंख्य आहेत. आणि प्रत्येक individual ची stress carry करण्याची strength ची level खूप भिन्न असणार. त्यामुळे अगदी लहान वयापासून मानसिक आरोग्यावर भर देणं खूपच गरजेचे आहे. त्यात व्यायाम, concentration, confidance , आहार, झोप…खूप गोष्टी येतील.

वरच्या case मधे इतके नावाजलेले डॉक्टर केवळ एका employee मुळे आत्महत्या करतील असे नाही वाटत. हे एक तत्कालीन कारण असावे पण याच्या मागे बरीच मोठी history असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाहेर येईल तेंव्हा कळेलच…

मला तर वाटत की जिथे स्ट्रेस वाटतो आहे तिथे तो बोलून आधी मोकळं झालं पाहिजे. सध्या मी तरी हीच strategy वापरते आहे. मानसिक तणावामुळे आयुष्य किती प्रमाणात डिस्टर्ब होऊ शकते याचा जवळून अनुभव घेतल्यावर माझे हे मत बनले आहे.

डॉ मधुरिमा कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Related Posts

WhatsApp Image 2026-02-19 at 5.49
24086808

Search

Categories

Subscribe to my Newsletter

No spam, notifications only about new stories and updates

Latest Posts

About Me

Hi! I am Dr. Madhurima Kulkarni

I am a Doctor and a phycology counselor by profession with a passion of reading. After having read a lot of books, magazines and online posts, I realized that I also posses a knack to write. My written work started getting some recognition.
So, this is my attempt to share whatever little work with YOU… Read, subscribe and comment your suggestions and feedback too.

Thank you