भिशी

आज शनिवार म्हणजे खर तर माझ्या भिशीचा वार…अशी भिशी की जिथे मैत्रिणी भेटतात, हसी – मजाक, गमती जमती, पोटभरून गप्पा , reels आणि खूप काही…म्हणजे तुमचा ताण तणाव जाऊन तुम्ही एकदम फ्रेश होणार….

पण गेले 4-5 महिने मी माझ्या वैयक्तिक ( दवाखाना – patients) कारणाने माझ्या सख्यांना भेटू शकले नव्हते. म्हणजे प्रत्येक भिशी झाली की group वर पडणाऱ्या फोटोज् आणि कॉमेंट्स च्या पावसाचा आनंद मी घ्यायचे पण शेवटी हे झालं virtual … प्रत्यक्ष भेटीची सर याला कशी येऊ शकेल?

त्यामुळे जेंव्हा सकाळी wats app पाहिलं तर एकदम लक्षात आल की अरे आज शनिवार म्हणजे आज भिशी असणार “आज जायलाच हवं ” माझ्या मनानं मला साद घातली आणि मरगळलेल्या मनाला अचानक ताजतवान वाटू लागलं.

ठरलेल्या वेळेला मी आमच्या भिशी हॉल वर पोचले आणि दारात पाऊल टाकण्याच्या आधीच हसण्या खिदळण्याचा परिचित आवाज माझ्या कानावर पडला. एका प्रचंड उर्मीने मी दार ढकललं आणि मनाला भावणार दृश्य माझ्या नजरेला पडलं… “अर्थात माझ्या सगळ्या मैत्रिणी”
मग काय गप्पा, जोक, खेळ सगळ्याला अगदी उधाण आल. आज माधुरीची भिशी होती. अशी माधुरी जी प्रत्येक भिशीत active असते. फोटोज् काढणे, reels बनवणे यात तिचा हातखंडा आहे. आजचा मेनुही खूप छान होता. इडली सांबार…आणि नंतर सुंदर अशी जायफळ घातलेली कॉफी… व्वा

आज कितीतरी दिवसांनी मी मला सापडले . आणि ते ही फक्त माझ्या प्रिय मैत्रिणींमुळे. खरंच मैत्री हे एकच अस नात आहे तिथं कुठल्याच boundries नसतात. असते ती फक्त निखळ मैत्री…

आता माझी निघायची वेळ झाली कारण patients वाट बघत होते. सगळ्यांचा निरोप घेऊन जेंव्हा मी निघाले तेंव्हा मला एकच जाणवलं की मी आज जगातली सर्वात आनंदी स्त्री आहे.🥰

डॉ मधुरिमा कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Related Posts

GondavalekarMaharaj
images

Search

Categories

Subscribe to my Newsletter

No spam, notifications only about new stories and updates

Latest Posts

About Me

Hi! I am Dr. Madhurima Kulkarni

I am a Doctor and a phycology counselor by profession with a passion of reading. After having read a lot of books, magazines and online posts, I realized that I also posses a knack to write. My written work started getting some recognition.
So, this is my attempt to share whatever little work with YOU… Read, subscribe and comment your suggestions and feedback too.

Thank you